Minister Bharane : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर निर्दोष , कृषिमंत्री भरणेंकडून पाठराखण

विशेष प्रतिनिधी

पुणे : Minister Bharane नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असताना, या प्रकरणात नाव जोडले गेलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकर यांची पाठराखण करत त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत.Minister Bharane

“या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा कुठलाही दोष नाही,” असे स्पष्टपणे सांगत भरणे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिप्रश्न केला. “कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या तिथे गेल्या असतील, एखाद्याला गुरू मानणं किंवा दर्शन घेणं यात चुकीचं काही नाही. कोणी बोलावलं म्हणून गेलो आणि त्याने फोटो काढला, तर त्यात आपली काय चूक?” असा सवाल त्यांनी केला.Minister Bharane



अशोक खरात याच्यावर जोतिष आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप असून, त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. चाकणकर यांच्या नावाचा संदर्भ पुढे आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. चाकणकर यांना तात्काळ पदावरून दूर न केल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा मुंडे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, अशा संवेदनशील पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. “गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाचा इशारा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, संजय राऊत यांनीही टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नैतिकतेच्या आधारावर रूपाली चाकणकर यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, चाकणकर पदावर कायम राहिल्यास पोलिस तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याशी संबंधित गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर चौकशी निष्पक्ष आणि प्रभावी होणे गरजेचे आहे. मात्र, सत्तास्थानी असलेल्या व्यक्तीमुळे तपासात हस्तक्षेप होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. चाकणकर त्यांची छत्री पकडतात, त्यांचे पाय धुतात, असे त्या म्हणाल्या.

Rupali Chakankar Cleared in ‘Fraud Baba’ Ashok Kharat Case, Backed by Minister Bharane

महत्वाच्या बातम्या