विशेष प्रतिनिधी
पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर सध्या धूळ आणि धुराच्या विळख्यात अडकले आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेली मेट्रोची कामे, उड्डाणपूल, रस्ते खोदाई आणि सोसायट्यांचे वाढते बांधकाम यामुळे पुणेकरांना शुद्ध हवेसाठी संघर्ष करावा लागत आहे. महापालिकेने हवेची गुणवत्ता मोजणारे डॅशबोर्ड लावले असले तरी, ही केवळ ‘आकडेवारी’ ठरत असून प्रत्यक्ष कृती शून्य असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
प्रदूषणाची ‘हॉटस्पॉट्स’ आणि मुख्य कारणे
शहरातील काही भाग प्रदूषणाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील बनले आहेत. यात प्रामुख्याने:
हडपसर, मुंडवा, कोंढवा: औद्योगिकीकरण आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ.
सिंहगड रोड, धायरी, नांदेड सिटी: उड्डाणपुलाचे काम आणि अरुंद रस्त्यांमुळे उडणारी धूळ.
बाणेर, बालेवाडी, हिंजवडी: आयटी पार्क परिसरातील गृहप्रकल्पांचे बांधकाम.
शिवाजीनगर आणि पेठ परिसर: मेट्रोची कामे आणि जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासातून निघणारा राडारोडा (C&D Waste).
मुख्य तांत्रिक समस्या: रस्त्यावरून धावणारे RMC (Ready Mix Concrete) डंपर
रस्त्यावर अनेकदा ओले सिमेंट सांडत जातात. हे सिमेंट वाळल्यानंतर त्याचे सूक्ष्म कणांत रूपांतर होते, जे वाऱ्यासोबत हवेत मिसळतात.
हवेची गुणवत्ता (AQI) आणि तांत्रिक वास्तव काय सांगतो ? ते ही पाहा..
पुण्यातील ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (AQI) अनेकदा १५० ते २५० च्या दरम्यान नोंदवला जातो, जो ‘धोकादायक’ श्रेणीत येतो.
PM 2.5 आणि PM 10: धुळीतील हे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसात शिरतात. बांधकामाच्या ठिकाणी ‘धुळीचे पडदे’ (Green Nets) न लावल्याने हे कण १-२ किमी परिघापर्यंत पसरतात.
थर्मल इन्व्हर्जन: हिवाळ्यात किंवा पहाटेच्या वेळी थंड हवेमुळे प्रदूषित कण जमिनीलगतच राहतात, ज्यामुळे धुरके (Smog) तयार होते.
आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
धुळीच्या साम्राज्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,ज्येष्ठ नागरिकांना दमा (Asthma) आणि ब्रॉन्कायटिसच्या त्रासात वाढतोय तर लहान मुलांमध्ये फुफ्फुसांची वाढ खुंटणे आणि वारंवार होणारी सर्दी-खोकला यासारख्या आजार दिसत आहेत.महिला व दुचाकीस्वार यांच्या संदर्भाने तर डोळ्यांची जळजळ, त्वचेचे विकार आणि सायनसचा त्रास वाढत असल्याचा तज्ञ सांगत आहेत. नागरिकांना आता घराबाहेर पडताना मास्क किंवा रुमालाचा आधार घ्यावा लागत आहे.
महानगरपालिकेच्या उपाययोजना: केवळ दिखावा?
पुणे महानगरपालिकेने (PMC) काही पावले उचलली आहेत, पण ती अपुरी आहेत.अँटी-स्मॉग गन फक्त काही भागात पाण्याचे फवारे मारण्यासाठी या गन वापरल्या जातात, मात्र त्यांची संख्या शहराच्या व्यापाच्या तुलनेत नगण्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिकेने लावलेले डॅशबोर्ड हे हवेची गुणवत्ता दर्शवणारे फलक लावले आहेत, पण गुणवत्ता खराब झाल्यावर नेमकी काय कृती करायची, याचे धोरण स्पष्ट नाही.
दंडात्मक कारवाई
नियम धाब्यावर बसवणाऱ्या बिल्डरांवर किंवा कंत्राटदारांवर होणारी कारवाई केवळ नावापुरतीच उरली आहे. पर्यावरण तज्ञांच्या मते, केवळ आकडे मोजून प्रदूषण थांबणार नाही. त्यासाठी खालील उपाय तातडीने हवेत.
पुणे ‘स्मार्ट’ होत असताना तिथला श्वास ‘स्वच्छ’ असणे ही प्राथमिक गरज आहे. महापालिकेने केवळ डॅशबोर्डवर आकडे न दाखवता, धूळ करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, पुणे हे ‘पेन्शनरांचे शहर’ न राहता ‘रुग्णांचे शहर’ होण्याची भीती आहे.
Pune is Suffocating! Road Excavation and Construction Leave City Under a Blanket of Dust
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर