इराणमध्ये पूल आणि विद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांची मानवी साखळी

विशेष प्रतिनिधी

तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृती संपुष्टात येऊ शकते’ अशी धमकी दिल्यानंतर इराणमध्ये मात्र लोक एकवटले असून पूल आणि विद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी त्यांनी मानवी साखळी केली होती.

इराणमधील इलाम शहरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि मानव साखळी तयार करून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग होता. आंदोलकांनी इराणी झेंडे आणि देशातील नेत्यांचे फोटो हातात घेतले होते.

अमेरिकेकडून वीज प्रकल्प आणि पुलांवर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर हा निषेध उभारण्यात आला. नागरिकांनी देशाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांविरोधात एकजूट दाखवत मानव साखळी तयार केली.



दरम्यान, इराणने अमेरिका आणि इतर देशांसोबत सुरू असलेले युद्धविराम चर्चेचे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला इराणने स्पष्ट कळवले की, आता तो चर्चेत सहभागी होणार नाहीत. यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, त्यांच्या अटी मान्य न झाल्यास इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जाऊ शकतात. एका रात्रीत इराणची वीज व्यवस्था आणि महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचली असून हा संघर्ष अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादाचा निर्णायक टप्पा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Human Chain Protest at Bridge, Power Project Site in Iran

महत्वाच्या बातम्या