युद्ध थांबलं!सोन्या चांदीच्या दरात विक्रमी उसळी..

विशेष प्रतिनिधी

पुणे: : आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट मौल्यवान धातूंच्या बाजारावर आणि सोने चांदीच्या भावावर पडलेला दिसून येत असून, सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी तेजी नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर तब्बल ३,०२७ ने वाढून सुमारे १.५३ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला, तर चांदीनेही जोरदार झेप घेत ११,५६० ची वाढ नोंदवत
२.४२ लाख प्रति किलोचा टप्पा ओलांडला. gold and silver prices

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, १० ग्रॅम सोन्याचा भाव १,५३,४७५ पर्यंत पोहोचला असून, १ किलो चांदीचा दर २,४२,३३९ वर जाऊन ठेपला आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी वाढ मानली जात असून, बाजारपेठेत यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.



तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव, युद्धाची शक्यता आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे मोठ्या प्रमाणावर वळण घेतले आहे. अशा परिस्थितीत ‘सेफ हेवन’ मानल्या जाणाऱ्या या धातूंना मोठी मागणी निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीत दिसून येत आहे.दरवाढीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लग्नसराईत खरेदीवर परिणाम

लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ग्राहकांनी सध्या खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, दर स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.
दुसरीकडे, गुंतवणूकदार मात्र या तेजीचा फायदा घेत नफा कमावण्याच्या प्रयत्नात आहेत.

The war has stopped! Record jump in gold and silver prices..

महत्वाच्या बातम्या