पुणे-सोलापूर विमानसेवा १ मे पासून सुरू; अवघ्या ४५ मिनिटांत प्रवास शक्य!

विशेष प्रतिनिधी

पुणे: स्टार एअर या विमान कंपनीला पुणे विमानतळावर १ मे पासून विमान उड्डाणासाठी परवानगी (स्लॉट) मिळाली आहे. यामुळे पुणे आणि सोलापूर ही दोन शहरे आता थेट विमानसेवेने जोडली जाणार आहेत. या सेवेमुळे अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पुण्याहून सोलापूरला पोहोचणे सहज शक्य होणार आहे.

या सेवेमुळे पश्चिम महाराष्ट्रात पुण्याशी विमानसेवेने जोडले जाणारे सोलापूर हे पहिलेच महानगर ठरणार आहे. पुणे ते सोलापूर या दोन महानगरांसाठी ही सातही दिवस सेवा उपलब्ध आहे. सोमवार ते शुक्रवार या काळात सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास विमानाचे उड्डाण होईल. ते विमान पुण्यात 40 ते 45 मिनिटांनी म्हणजे 3 वाजून 15 ते 20 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दुपारी चार वाजता सोलापूरकडे विमानाचे उड्डाण होईल. 4 वाजून 40 ते 50 मिनिटांनी विमान सोलापुरात पोहोचेल. शनिवारसाठी सोलापूरहून 4 वाजून 20 मिनिटांनी विमान पुण्यात दाखल होईल, तर पुण्याहून सोलापूरसाठी 4 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण होईल.



पुणे – सोलापूर – पुणे फ्लाईट क्रमांक एस 5-311/332 असा असेल

विमान पुण्यातून साधारणतः 45 मिनिटांत पुण्याहून सोलापूरला पोहोचेल

सोलापुरातून विमान पुण्यात पोहोचल्यावर काही काळातच देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व भागात पुण्यातून विमान कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याने या कनेक्टींग फ्लाईटचा सोलापूरकरांना खूप छान फायदा होऊ शकतो

Pune-Solapur Flight Service to Launch on May 1; Travel Time Just 45 Minutes!

महत्वाच्या बातम्या