विशेष प्रतिनिधी
नाशिक : TCS Nashik case टीसीएस नाशिक येथील कथित लैंगिक छळ, मानसिक अत्याचार आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणातील आरोपी शफी शेख याने कारागृहात इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. गुरुवारी झालेल्या इन-कॅमेरा सुनावणीदरम्यान त्याने न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली.TCS Nashik case
या प्रकरणी शफी शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी शफी शेखने नाशिक रोड कारागृहात आपल्यावर शारीरिक हल्ला झाल्याचे सांगितले. त्याने कारागृहात पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली आहे. मात्र, या कथित हल्ल्याबाबत अद्याप वैद्यकीय तपासणी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.TCS Nashik case
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, कारागृहातील हल्ल्याच्या दाव्याचीही स्वतंत्र चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी आणि एचआर व्यवस्थापक निदा खान यांचा समावेश आहे.
तसेच या प्रकरणी एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तर उर्वरित आठ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहेत. एका पुरुषासह एकूण ९ जणांनी छळ, मानसिक अत्याचार आणि जबरदस्ती धर्मांतराबाबत तक्रारी दिल्या आहेत.
या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, कार्यस्थळी सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
TCS Nashik case: accused alleges assault inside jail, seeks protection in court
महत्वाच्या बातम्या