विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर

विशेष प्रतिनिधी

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक कल हाती येत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्याभोवती फिरणारे तामिळनाडूचे राजकारण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाने निवडणुकीत प्रस्थापितांना पाणी पाजले असून, राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री सध्या पिछाडीवर आहेत. Vijay

तामिळनाडूच्या राजकारणात कधीही न पाहिलेले चित्र दिसत आहे. सत्ताधारी द्रमुक सरकारमधील दिग्गज चेहरे आणि स्वतः मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तसेच त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन पिछाडीवर आहेत.

एक्झिट पोलमध्ये ‘अॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. थलपती विजय यांच्या TVK पक्षाने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत बहुमताच्या आकड्याकडे (118) वेगाने धाव घेतली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा एखादा पक्ष थेट सत्तेच्या जवळ पोहोचण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ ठरण्याची शक्यता आहे.



सध्याचे पक्षनिहाय बलाबल (कल)

टीव्हीके (TVK): १००+ जागांवर आघाडी

अ. द्रमुक + भाजप आघाडी: ६५ जागांवर आघाडी

द्रमुक + काँग्रेस आघाडी: ५२ जागांवर आघाडी

इतर: २ जागांवर आघाडी

Vijay wave hits Tamil Nadu, 31 of 32 DMK ministers including Stalin trail

महत्वाच्या बातम्या