Mamata Banerjee : ममता बॅनर्जींचा भवानीपूरमध्ये पराभव; सुवेंदू अधिकारी यांचा १५ हजार मतांनी विजय

विशेष प्रतिनिधी

कोलकाता: Mamata Banerjee पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५,११४ मतांनी त्यांना पराभूत करत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.Mamata Banerjee

मतमोजणीदरम्यान ममता बॅनर्जी सुमारे पाच तास केंद्रात उपस्थित होत्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “मला आत ढकलण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. या निकालाबाबत फेरमतमोजणी झाली पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. “ममता बॅनर्जींचा पराभव हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट ठरू शकतो,” असे ते म्हणाले.Mamata Banerjee



त्यांनी मतदानाच्या पॅटर्नवर भाष्य करत दावा केला की, “हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध समाजाने मला पाठिंबा दिला, त्यामुळे हा विजय शक्य झाला.”

दरम्यान, पाणीहाटी मतदारसंघात आर. जी. कर बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आई रत्ना देबनाथ यांनी विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी हा निकाल “पाणीहाटीच्या जनतेचा आणि संपूर्ण बंगालचा विजय” असल्याचे सांगितले.

“मी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित करते. लोकांनी घोष कुटुंबाच्या गैरकारभारातून मुक्ती मिळवून दिली,” असे त्यांनी नमूद केले.

भवानीपूरसारख्या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात झालेला हा पराभव तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ममता बॅनर्जी या राज्याच्या राजकारणातील प्रमुख चेहरा असल्याने या निकालाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee defeated in Bhabanipur; Suvendu Adhikari wins by 15,000 votes

महत्वाच्या बातम्या