विशेष प्रतिनिधी
पुणे: देशात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एक महिला ताब्यात घेतली आहे.पुण्याचा बिबवेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे (४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून,सदरील महिला स्वतःचा ब्युटीपार्लर चा व्यवसाय करते.
कोण आहे मनिषा वाघमारे?
मनिषा वाघमारे ही बिबवेवाडी परिसरात स्वतःच ब्युटीपार्लर चालवत होती.मात्र ब्युटी पार्लरच्या आडून, ती वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना संपर्क साधून त्यांना पेपरफुटी रॅकेटमधील आरोपींपर्यंत पोहोचवत होती.विशेष म्हणजे,आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील विद्यार्थ्यांना गाठून वेगवेगळ्या आमिषांद्वारे त्यांना जाळ्यात ओढले जात होते.
प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय लोखंडे याच्याशी मनीषा वाघमारेचा सतत संपर्क असल्याचे उघड झाले आहे.विद्यार्थ्यांना शोधणे,त्यांची आर्थिक क्षमता बघणे आणि त्यांना मुख्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे,अशी भूमिका मनीषा वाघमारे पार पाडत होती.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान मनिषा वाघमारेचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,परीक्षेच्या काळात तिच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे.हे व्यवहार विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांशी संबंधित आहेत का?या सर्व गोष्टीचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे.
सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि पुणे पोलिसांकडून प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात आले आहे.