Missing Link : मिसिंग लिंक’ परिसरात भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Missing Link मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.Missing Link

मुंबई पुणे महामार्गावर बसची 3 खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या नागरिकांना हेल्प फाउंडेशन या बचाव टीमकडून गॅस कटरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील टेम्पो आणि बस अपघातानंतर चारही लेन खुल्या करण्यात आल्या आहेत.



डकून पडलेली वाहने तीन लेनवरून सुरू करण्यात आली आहे. अपघातातील वाहने बाजूला करण्यात पोलिसांना उशिरा यश आले असून मुंबई पुणे महामार्गावर मिसिंगलिंक वर सलग 2 अपघात घडले होते. महामार्गावर वाहतूक कोंडी बघता दुसऱ्या लेनवरून वाहने सोडण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, मिसिंग लिंकवर सुरक्षेची मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी मिसिंग लिंकवर पहिल्यांदाच हा असा जीवघेणा अपघात झाला असून त्यामागील कारणांचा शोध घेऊन असा अपघात पुन्हा होऊ नये, याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Three killed, four critically injured in horrific crash near Mumbai-Pune Expressway ‘Missing Link’

महत्वाच्या बातम्या