Nasrapur rape : नसरापूर अत्याचार प्रकरण; १५ दिवसांत अकराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : Nasrapur rape नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत तब्बल एक हजार १०० पानी दोषारोपपत्र आज न्यायालयात दाखल केले. घटनाक्रम, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल असे महत्त्वाचे पुरावे दोषारोपपत्रात जोडण्यात आले आहेत.Nasrapur rape

या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नसरापून येथे रास्ता रोको अंदोलन आणि पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता. १६) रात्री दोषारोपपत्र सादर केले. यावेळी गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि तपास अधिकारी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या.Nasrapur rape



एक मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा वेगाने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. तपासादरम्यान आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (री-क्रिएशन) करण्यात आली. आरोपी घटनास्थळी कसा पोहोचला?, चिमुरडी कुठे खेळत होती?, तिला कोठून नेण्यात आले? आणि गोठ्यात अत्याचार नेमका कुठे झाला?, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी पुन्हा उभा केला.

तपासादरम्यान परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. घटनेच्या वेळी परिसरात लपाछपी खेळणाऱ्या १० ते ११ वर्षे वयोगटातील दोन मुलांनी आरोपीला गोठ्याकडे जाताना पाहिल्याचे समोर आले असून, हे दोघे या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. दोषारोपपत्रात बालिकेचा शवविच्छेदन अहवालही जोडण्यात आला आहे. आपीने बालिकेच्या तोंडात बोळा कोंबल्याचे तसेच तिच्या शरीरावर जखमा आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गुन्ह्यातील आरोपीवर यापुर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. तांत्रीक कारणांमुळे त्या गुन्ह्यांत त्याची सुटका झाली आहे. मात्र या गुन्ह्यात त्याच्या विरोधात सक्षम पुरावे आहेत. पुणे ग्राणीम पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत अचूक तपास केलेला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळणार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात इतक्या कमी वेळेत दोषारोपपत्र दाखल झाल्याची ही पहिलीच वेळ असावी, असे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल म्हणाले, आरोपीला कठोरातील कठोर शासन होण्यासाठी आवश्यक त्या कलमांनुसार या गुन्ह्याचा तपास करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने तपास झाला असून त्यासाठी आमची टीन गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने कार्यरत होती. कायदेशीर बाबी तपासून दोषारोपपत्र तयार करण्‍यात आले आहे. कमीत काम वेळेत मुलीला न्याय मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Nasrapur rape and murder case: 1,100-page chargesheet filed in 15 days

महत्वाच्या बातम्या