agriculture minister : मदतीसाठी दारात आलेल्या शेतकऱ्याची कृषि मंत्र्यांकडून थट्टा, साेशल मीडियावर संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : agriculture minister  जळालेल्या उसाच्या पिकाचे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, या आशेने कृषिमंत्र्यांच्या दारात पोहोचलेल्या एका शेतकऱ्याची राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थट्टा केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका होत आहे.agriculture minister

खडकवासला भागातील एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झाला होता. हवालदिल झालेला हा शेतकरी सरकारी मदतीसाठी आणि जळालेल्या पिकाच्या पंचनाम्याची याचना घेऊन थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचला होता. शेतकऱ्याने मंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडण्याचा आणि उसाचे झालेले नुकसान सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कृषिमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी अत्यंत अनादराने आणि दुर्लक्षाची भूमिका घेतली. “तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे,” असे उपरोधिक वक्तव्य करत मंत्री भरणे यांनी शेतकऱ्याला झटकले. शेतकऱ्याचे बोलणे ऐकून न घेताच ते तरातरा आपल्या शासकीय कारमध्ये बसले आणि तिथून निघून गेले.agriculture minister



शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये झालेला संवाद :

शेतकरी: “मामा, जळालेल्या उसाचे पंचनामे करायचे आहेत…”

दत्तात्रय भरणे: “नाही, माझ्याकडे तुमचे नाही. मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे मी. तुम्ही मोठी माणसे आहात सगळी. मोठ्या माणसांचे ऐकून सगळं करणार. तुम्हाला ज्यांनी सांगितले, त्यांना हे करायला सांगा.”

शेतकरी: “मामा, तुम्ही शब्द दिला होता…”

दत्तात्रय भरणे: “नाही, मी नव्हता शब्द दिला. तुमचा आणि माझा काही शब्द झालेला नाही. तुम्ही आंदोलन केले होते. परत शब्द नाही दिला.”

मंत्र्यांच्या या असंवेदनशील वागणुकीचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो आहे. “अन्नदात्याची अशी थट्टा करणारे कृषिमंत्री काय कामाचे?” असा सवाल करत नेटकऱ्यांनी मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

Farmer who came to his door for help mocked by agriculture minister, anger on social media

महत्वाच्या बातम्या