Manoj Jarange : नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण देण्यात अडचण काय, मनाेज जरांगे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

बीड : Manoj Jarange आम्ही ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून आम्हाला द्या, असे कधीच म्हणालो नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. आमच्या नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण देण्यात अडचण काय?” असा प्रश्न मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी केला आहे.Manoj Jarange

बीड येथे माध्यमांशी बाेलताना जरांगे म्हणाले, आम्ही वारंवार आंदोलन करायचं आणि सरकारने आम्हाला हलक्यात घ्यायचं, असे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांना पुढचा काळ जड जाईल मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. ” मराठा समाजाचा वारंवार अवमान केला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर 2029 च्या निवडणुकीत मराठा समाज त्याचा हिशेब चुकता करेल. समाजाचा अवमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.Manoj Jarange



मनाेज जरांगे म्हणाले, हैदराबाद गॅझेटमधील नोंदी उपलब्ध आहेत, ऐतिहासिक पुरावे आहेत, तरीही आरक्षण का दिले जात नाही? तुम्ही नेमके कुणाला घाबरून हे करत आहात? बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या. मात्र काही अधिकाऱ्यांनी त्या नोंदी हटवल्या.वडवणीतील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोंदी हटवल्या आहेत. नोंदी हटवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय, हे समजत नाही. स्वतःला तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या लोकांनाही ही बाब का समजत नाही?” असा सवाल करत जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. राठा समाजाची मागणी ही स्वतंत्र हक्काची असून कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याची नाही.

मनोज जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावर असताना त्यांनी आंदोलनादरम्यान अपघातात जखमी झालेल्या एका मराठा सेवकाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अंतरवली सराटी येथील आंदोलनातून परतताना या कार्यकर्त्याचा अपघात झाला होता. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.

If there are records, what is the problem in giving us reservation, asks Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या