विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अल निनोच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी जलसंधारणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीदरम्यान हवामानाशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी देशाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या ११वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक पार पडली. सर्व २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी याला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य हवामान संकटांकडे लक्ष वेधले. हवामान बदलामुळे मोठे आव्हानहवामानातील बदलांमुळे शेती, जलसाठे आणि उपजीविकेसमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात; त्यामुळे पूर्वतयारी आणि संसाधनांचे दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी मांडले.
अल निनो ही मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेळोवेळी वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सामान्यतः भारतातील मान्सूनवर नकारात्मक परिणाम करते. अल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतात पाऊस कमी पडतो. जागतिक हवामान संघटनेने यासंदर्भात आधीच इशारा दिला आहे. २०२६ च्या मध्यापासून अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामान पद्धतींवर होईल असे म्हटले गेले आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञ अल निनोच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अनेक अंदाज यासंदर्भात मांडले गेलेले आहेत.
In the wake of El Nino, Prime Minister Narendra Modi appeals to states
महत्वाच्या बातम्या