विशेष प्रतिनिधी
माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे भाविकांना घेऊन जाणारे पिकअप गाडीचे नियंत्रण सुटल्याने थेट खाजगी शेतातील विहिरीत कोसळले.
या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून बचावकार्य आणि जखमींच्या उपचारावर आमचे बारीक लक्ष आहे,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर सगळे पीकअप वाहनाने परत निघाले. म्हसवड-तांदुळवाडी रस्त्यावरून माघारी येत असताना गाडी अनियंत्रित झाली आणि थेट विहिरीत कोसळली. विहिरीत भरपूर पाणी असल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाला.
State government provides Rs 5 lakh assistance to the kin of those killed in Malshiras accident
महत्वाच्या बातम्या