ध्येयवादी माणसे कधी बदलत नाहीत, पक्षांतर करणाऱ्या खासदारांना अण्णा हजारेंचा टाेला

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : ध्येयवादी माणसे कधी बदलत नाहीत. आपले हित साधणारे लोक दल बदल करत असतात, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या खासदारांवर केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा हजारे म्हणाले, पक्षांतरबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. फोडाफोडी हा राजकारणाचा भाग झाला. पक्ष बदल बरोबर नाही. श्रद्धा, निष्ठा आणि ध्येयवाद नाही. ज्यांच्याकडे ध्येयवाद आहे की, मला माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी काहीतरी करायचे आहे. असे लोक पक्ष बदल करणार नाहीत.



लोकशाही आहे. लोकशाहीला आपण विरोध कसा करणार? विरोध करता येणार नाही. चुकीचे काम करत आहेत, त्यांना विरोध करायचा आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करत असतील, मग भले राजकारणी का असेना, त्यांना काम करू द्यावे. चांगले कायदे करणारे लोक आले पाहिजेत. ज्या दिवशी असे लोक येतील, त्या दिवशी फरक होईल ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या निर्णयामागे नेमकी कोणती कारणे होती, याचा खुलासा आता संबंधित खासदारांनीच केला आहे. अविश्वासाचे वातावरण, पक्षातील काही नेत्यांची वागणूक आणि मतदारसंघातील विकासकामांची अडचण ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि महायुतीकडून अत्यंत गुप्त व पद्धतशीर रणनीती आखण्यात आली होती. गेल्या १० महिन्यांपासून पडद्यामागे हे राजकीय नाट्य सुरू होते. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटाचे स्वतंत्र मेळावे झाले. जाहीर सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीरपणे ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला आणि “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे” असा इशारा दिला.

Goal-driven people never change, Anna Hazare’s jibe at MPs switching parties

महत्वाच्या बातम्या