विशेष प्रतिनिधी
पुणे ; Pune जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने दडी मारल्यामुळे पुणे शहरावर भीषण जलसंकटाचे सावट गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, सध्या धरणांमध्ये केवळ ३.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. हा साठा पुणेकरांची जेमतेम दोन महिने तहान भागवू शकतो. या पार्श्वभूमीवर, पाणी कपातीनंतर आता महापालिकेने थेट निसर्गाला साद घालण्यासाठी ‘कृत्रिम पाऊस’ पाडण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे.Pune
सोमवारी (२९ जून) झालेल्या पालिकेच्या सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर कृत्रिम पावसासंदर्भातील संपूर्ण तांत्रिक माहिती तातडीने गोळा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.Pune
यंदा मान्सून लांबल्याने धरणक्षेत्रात खडखडाट निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात एक दिवस आड पाणी कपात लागू केली आहे. मात्र, त्यानंतरही धरणातील पाणी पातळी सातत्याने खालावत असल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली आहे. केवळ दोन महिने पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने आता तातडीने पर्यायी उपाय शोधणे गरजेचे बनले आहे.
सोमवारी झालेल्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली. शहराची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर करता येईल का, यावर सर्वपक्षीय गट नेत्यानी चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी या संदर्भात आयुक्तांना तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले असून,यापूर्वी देशात किंवा राज्यात अशा प्रकारचे प्रयोग कुठे कुठे राबवण्यात आले आणि ते कितपत यशस्वी ठरले? हा प्रयोग करण्यासाठी कोणत्या नामांकित संस्थांची मदत घेता येईल? कृत्रिम पावसाचा यशस्वी होण्याचा दर किती आहे आणि त्यावर होणारा खर्च किती फायदेशीर ठरेल?पुणे शहराला पाणी उपसा करणाऱ्या धरण साखळी परिसरात कृत्रिम पाऊस पाडून शहराची पाण्याची गरज भागवता येऊ शकते का? वरील मुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
आता महापालिका आयुक्तांच्या अहवालानंतरच पुणेकरांची तहान भागवण्यासाठी विमानाने ढगांवर मारा होणार की वरुणराजाच्या कृपेची वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट होईल. मात्र, महापालिकेच्या या हालचालींवरून पुण्यातील पाणी संकट किती गंभीर वळणावर पोहोचले आहे, याची प्रचिती येत आहे.
As Reservoirs Dry Up, Pune Civic Body Explores Artificial Rain
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली