Capsule Case : भायखळा झिंक फॉसफाईड कॅप्सूल प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Capsule Case मुंबईतील भायखळ्यातील मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी गोळ्यांचं वाटप करणाऱ्या फैय्याज प्रेमजीला आणखीन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. रिमांड संपत असल्यानं त्याला सोमवारी कोर्टापुढं हजर करण्यात आलं होतं. मात्र फैय्याजच्या या विषारी कॅप्सूल प्रकरणात अधिक धक्कादायक माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सोमवारी कोर्टात सांगितलंय.Capsule Case

आरोपीची पोलीस कोठडी संपत असल्यानं मुंबई पोलिसांनी त्याला सोमवारी माझगाव दंडाधिकारी कोर्टापुढं हजर केलं. आरोपीची आणखीन चौकशी करण्याकरता पोलिसांनी त्याची सात दिवसांकरता पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैय्याजनं एकूण 30,000 कॅप्सूल मागवल्या होत्या. यातील 14,900 झिंक फॉस्फईड भरलेल्या कॅप्सूल मिळाल्या असून, उर्वरित 15000 कॅप्सूल हस्तगत करणं अद्याप बाकी आहे. फैय्याजनं सर्व साहित्य ऑनलाईन पद्धतीनं दोन वेगवेगळ्या राज्यातून मागवलं होतं. ते साहित्य कुठून आलं होतं, याचा शोध लागला असून पोलिसांची दोन पथक त्या दोन राज्यात रवाना झालेली आहेत. ज्यांनी नियम व अटींचं पालन न करता हा माल विकला असेल, त्यांच्यावरही अटकेची कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसंच आरोपी फैय्याजचे इराण आणि इराक कनेक्शनचे धागेदोरे सापडले असून त्याबाबतही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित ‘लोन वुल्फ अटॅक’चा प्रकार होता का?, त्याचा काही दहशतवादी हेतू होता का? याबाबत पोलिसांना तपास करायचाय अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. याची नोंद घेत कोर्टानं फैय्याजला आणखीन पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.Capsule Case



फैय्याजनं शेकडोंच्या गर्दीत वाटलेल्या गोळ्या पेनकिलर असल्याच्या समजत त्यासोबत घेऊन लोक मुंबई आसपासच्या भागात निघून गेले. नालसोपाऱ्यातही एक रूग्ण आढळून आलाय. तर डोंगरी परिसरातील हबीब रूग्णालयात नव्यानं दाखल झालेल्या रूग्णानं DCNला दिलेल्या माहितीत धक्कादायक माहिती दिलीय. दिलबर हुसैन यांना तुमचा मधुमेह देखील या गोळ्यांनी नियंत्रणात येईल, असं सांगत फैय्याजनं त्यांना 10 कॅप्सूल दिल्या होत्या. या गोळ्या आयुर्वेदिक असल्याचं देखील त्यानं दिलबर यांना सांगितलं होतं. दिलबर यांनी जुलूसच्या दिवशी कॅप्सूल खाल्ली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर डायबिटिसची गोळी संपली होती म्हणून त्यांनी फैय्याजनं दिलेल्या दोन कॅप्सूल घेतल्या. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना त्रास होऊ लागला. उलटी, जुलाब आणि अंग दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणात समोर आलेली आणखीन एक बाब म्हणजे आरोपी फैय्याज प्रेमजीनं वाटप केलेल्या कॅप्सूलसोबत एक चिट्ठीही प्रत्येक पिशवीत टाकलेली होती. या चिट्ठीत संबंधित कॅप्सूल अनेक आजारांवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. हे औषध आयुर्वेदिक असून कॅन्सर, अलझायमर, डायबिटीस, थायरॉईड, आस्थमा, किडनीचे आजार अशा अनेक आजारांवर या कॅप्सूलचा वापर होऊ शकत असल्याचा दावा करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, त्या चिट्ठीवर एका नामांकित फार्मा कंपनीचंही नाव छापलेलं आहे. चिट्ठीचा उल्लेख असलेल्या फार्मा कंपनीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचाही तपास सुरू आहे.

Shocking Revelations Emerge in Byculla Zinc Phosphide Capsule Case

महत्वाच्या बातम्या