विशेष प्रतिनिधी
पुणे: Amol Kolhe महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “मला आतापर्यंत पक्षांतराची कोणतीही ऑफर आलेली नाही. मात्र, अशी ऑफर आली तर त्याबाबत विचार करेन,” असे सूचक विधान कोल्हे यांनी केले.Amol Kolhe
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचेही कौतुक केले. “दिल्लीत नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांचेही ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून नाव घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ही भावना व्यक्त करत आहे,” असे कोल्हे म्हणाले.Amol Kolhe
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “राजाभाऊ वाजे आणि मी पक्ष बदलला तरच पुणे-नाशिक रेल्वे होणार असेल, तर हा विकासाचा प्रकल्प आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून पक्षांतर घडवून आणण्याचा प्रयत्न?” असा सवाल त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.शरद प
वार गटातील खासदार फुटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना कोल्हे म्हणाले, “पवार साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. शरद पवार यांनी याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली असून, खासदार फुटीचा प्रश्नच उद्भवत नाही.”
अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“Will Consider If an Offer Comes”: Amol Kolhe’s Remark Sparks Political Buzz, Praises Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि पुढे करणार काय??, वाचा तपशीलवार!!
- HSRP : HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून थेट कारवाई; मुदतवाढ संपली, परिवहन मंत्र्यांचा इशारा
- सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??
- गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई; बालबेडा जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून नष्ट!!