विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा) पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विकासकामे, कायदेशीर प्रक्रिया आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाली. Amit Shah
महाराष्ट्रामध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आणि ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतरचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच मोठा दिल्ली दौरा होता. Amit Shah
सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांचा मुद्दा अमित शहा यांच्यासमोर मांडला. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याची मागणी त्यांनी केली. Amit Shah
अमित शहा यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. तसेच, मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीत केवळ विकासकामेच नाही, तर शिवसेनेचा केंद्रातील भविष्यातील राजकीय सहभाग आणि पावसाळी अधिवेशनाची रणनीती यावरही सविस्तर चर्चा झाली.
आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर एकनाथ शिंदे यांचा भर आहे. त्यानुसार, लोकसभा सचिवालय लवकरच या 6 खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत विलीनीकरण झाल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे
Six MPs aligned with Shinde meet Amit Shah, raise key demands
महत्वाच्या बातम्या