Ajit Pawar : अजितदादांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा; जयंतीचा शासकीय सूचीत समावेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 22 जुलै या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांच्या जयंती कार्यक्रमाच्या सूचीमध्ये करून शासकीय कार्यालयात आयोजित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (14 जुलै) एका निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले होते. यानंतर आता अजित पवारांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश करण्यात आला आहे.Ajit Pawar

राज्याच्या प्रगतीत अजित पवारांची महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेता सन 2026 मधील शासकीय जयंती कार्यक्रमाच्या सूचीमध्ये 22 जुलै हा अजित पवारांच्या जयंतीचा नव्याने समावेश करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आवश्यक सुधारीत परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना तात्काळ अवगत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदनात करण्यात आली होती.Ajit Pawar



विभागीय आय़ुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलयात अजित पवारांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सदर शासन परिपरत्रक सर्व शासकीय आणि निमशआसकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळांना देखील लागू राहणार आहे.

बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून विमानातून बारामतीसाठी निघाले होते. मुंबईहून विमान उड्डाण केल्यावर साधारण 30-35 मिनिटानंतर कोसळले होते.

Ajit Pawar grants Rashtrapurush status; birth anniversary included in official government calendar

महत्वाच्या बातम्या