अर्नाळा समुद्रात चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू

विशेष प्रतिनिधी

विरार: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी नालासोपारा पश्चिमेतील 14 ते 17 वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . यापैकी दोघांना पोलिस आणि होमगार्ड जवानांनी धाडसाने वाचवले, तर अन्य दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

आज सकाळी सुमारे 9.45 वाजता ही चारही मुले समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करत असताना किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदार, पुरुष होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांनी त्यांना समुद्रात उतरू नये, अशी सूचना देत हटकले होते. त्यानंतर गस्त पथक पुढे निघून गेले. मात्र, पथक निघून गेल्यानंतर ही मुले पुन्हा समुद्रात उतरली. काही वेळातच मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केल्याने पोलीस आणि होमगार्ड जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्यात उड्या मारल्या. त्यांनी दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, उर्वरित दोघांना समुद्राच्या जोरदार लाटांनी आत खेचले आणि ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.


CM Fadanvis  : शासकीय निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी व्यापक सुधारणा कराव्यात; मुख्यमंत्र्यांचे निर्देश


सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली,

विशेष म्हणजे, अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्राच्या पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याबाबतचे इशारे देणारे फलकही अर्नाळा सागरी पोलिसांनी समुद्रकिनारी लावले आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सध्या जीवरक्षक, सर्च क्लब, अग्निशमन दल आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता दोन्ही मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

Four minors drowned in the sea at Arnala; two were successfully rescued, while the search for the other two is underway.

महत्वाच्या बातम्या