विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Eknath Shinde शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला अखेर लोकसभा सचिवालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीन होण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केल्यामुळे आता हे ६ बंडखोर खासदार तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या शिंदे यांच्या पक्षाचाच अधिकृत भाग बनले आहेत.Eknath Shinde
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत स्वतःचा वेगळा गट स्थापन केला होता. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आणि शिंदे गटात विलीन होण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते.Eknath Shinde
या घडामोडी लक्षात येताच ठाकरे गटाने तातडीने कायदेशीर पावले टाकत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. “आमच्या मूळ पक्षाने कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र असून कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेतली जावी,” अशी आग्रही विनंती ठाकरे गटाने केली होती. काहीही झाले तरी या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावाही ठाकरे गटाकडून केला जात होता.
बंडखोर सहा खासदारांचा निर्णय लोकसभा सचिवालय यांच्याकडे प्रलंबित होता. आज दिवसभर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र पार पडले. त्यानंतर आता सायंकाळी लोकसभा सचिवालयाकडून बुलेटिन जारी करत, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 बंडखोर खासदारांच्या एकनाथ शिंदेंच्या पक्षातील विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.
लोकसभा सचिवालयाच्या या अधिकृत मंजुरीमुळे बंडखोर खासदारांवर टांगती असलेली अपात्रतेची तलवार आता तात्पुरती दूर झाली आहे.लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांची संख्या अधिकृतपणे १३ झालेली आहे. या फुटील खासदारांच्या गटाचे नेते म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आलेली आहे.
Lok Sabha Secretariat Recognises Separate Group of Six Rebel Thackeray Faction MPs
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका