विशेष प्रतिनिधी
मुंबई :Fadnavis तुमची लोकशाही आणि संविधानावर खरोखर निष्ठा असेल, तर संसदेत चर्चेपासून का पळता? पळपुटेपणा सोडा आणि तथ्यांसह चर्चेला सामोरे या,” अशा शब्दांत राहुल गांधी यांना लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर करून विरोधक आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेत समोरासमोर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिलेFadnavis
राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, ते अराजकतावादी मानसिकतेतून काम करत आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटक आणि पंजाबसारख्या काँग्रेसशासित राज्यांतही पेपरफुटीच्या घटना घडल्या. पण काँग्रेस स्वतःच्या राज्यांतील घटनांकडे दुर्लक्ष करते आणि केंद्रातील घटनांवर राजकीय गदारोळ करते.Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात शिक्षणासाठी अत्यंत कमी आर्थिक तरतूद केली जात होती. भाजप सरकारने शिक्षणाचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणावर वाढवली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, दोषींवर कारवाई आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांच्या भूमिकेवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “जेव्हापासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील अंतर वाढले आहे, तेव्हापासून राज ठाकरेंना सगळीकडे जंतर-मंतरच दिसत आहे.”
आंदोलनांत कलाकारांच्या सहभागावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, अनेक कलाकार प्रामाणिक भावना आणि सामाजिक बांधिलकीतून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, काही जण आंदोलनाचा उपयोग स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी आणि सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी करत आहेत.सर्व आंदोलकांचा हेतू चुकीचा आहे, असे आम्ही म्हणत नाही. पण प्रत्येक आंदोलनात काही प्रवृत्ती मूळ विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करतात.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजेच TET प्रकरणाचा उल्लेख केला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा TET घोटाळा झाला. आज तेच लोक पेपरफुटीच्या मुद्द्यावर आम्हाला ज्ञान देत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
Fadnavis targets Rahul Gandhi, Raj and Uddhav Thackeray, slams ‘publicity-seeking’ artists in protests
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…

