विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मोठी कारवाई करत 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.PM Modi
NTA मधील परीक्षा व्यवस्थापन, गोपनीयता आणि सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संस्थेच्या कामकाजात व्यापक बदल करण्याच्या प्रक्रियेचा हा पहिला मोठा टप्पा मानला जात आहे.PM Modi
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशानंतर अवघ्या 20 तासांच्या आत NTA ने ही कारवाई केली. त्यामुळे पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारने कठोर पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 23 जुलैच्या मध्यरात्री सुमारे 2 मिनिटे 56 सेकंदांचा व्हिडिओ संदेश जारी केला होता. पेपरफुटी हा साधा विषय नसून लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पेपरफुटीपासून मागील अडीच महिन्यांत अनेक कठोर पावले उचलण्यात आली असून, प्रकरणातील आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कमी कालावधीत सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकार केवळ कारवाई करून थांबणार नसून, पेपरफुटीच्या प्रकरणांची जलद सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, NTA च्या परीक्षा व्यवस्थेत मोठे तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकांची छपाई, वाहतूक, वितरण आणि डिजिटल देखरेखीची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन यंत्रणा उभारली जाणार आहे.
आउटसोर्सिंग व्यवस्थेचाही फेरआढावा घेतला जाणार आहे. बाह्य संस्थांना दिल्या जाणाऱ्या कामांवर कडक नियंत्रण ठेवणे, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि प्रत्येक टप्प्यावर डिजिटल ट्रॅकिंग लागू करण्याचा विचार सुरू आहे.
पेपरफुटीची शक्यता पूर्णपणे रोखण्यासाठी नवीन परीक्षा प्रणाली विकसित करण्याची तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षा केंद्रांवरील देखरेख, प्रश्नपत्रिका हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी आणि संशयास्पद हालचालींची तातडीने माहिती मिळण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयातील दोन सचिवांची बदली केली होती. त्यानंतर आता NTA मधील 47 अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई ही परीक्षा व्यवस्थेतील मोठ्या शुद्धीकरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणात आणखी अधिकारी आणि बाह्य संस्थांची चौकशी होण्याची शक्यता असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
NTA Sacks 47 Officials Over NEET Paper Leak, Acts Within 20 Hours of PM Modi’s Message
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका