Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागासाठी ‘फिनोलेक्स’कडून अत्याधुनिक २-डी इको मशीन भेट
विशेष प्रतिनिधी पुणे, Sassoon Hospital ता. २३ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) अत्याधुनिक २-डी इकोकार्डिओग्राफी (२-डी इको) मशीन उपलब्ध करून देण्यात आले.













