बारामतीत काँग्रेसकडून माजी आमदाराचे पुत्र आकाश मोरे मैदानात, अभिजित बिचुकले, लक्ष्मण हाकेही लढणार

विशेष प्रतिनिधी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने उमेदवार देत ही शक्यता आता पूर्णतः धुळीस मिळाली आहे. काँग्रेसकडून आकाश विजयराव मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Baramati Poll

आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे चिरंजीव आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याने त्यांना ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, २०१४ साली आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीचा अनुभव असून, काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा संधी दिली आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीत केवळ काँग्रेसच नव्हे, तर इतर इच्छुकांनीही मैदानात उतरत स्पर्धा अधिक चुरशीची केली आहे. लक्ष्मण हाके आणि अभिजित बिचुकले यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेमुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र काँग्रेसच्या निर्णयामुळे बारामतीत आता थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती पोटनिवडणूक लढविणार

Baramati Poll Battle Heats Up: Congress Fields Akash More; Abhijit Bichukale and Laxman Hake

महत्वाच्या बातम्या