R. Sreelekha : केरळमधील भाजपची नवी आशा, आयपीएस अधिकारी आर. श्रीलेखा होणार तिरुवनंतपुरमच्या महापौर
केरळच्या माजी डीजीपी आणि राज्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आर. श्रीलेखा यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर काही महिन्यांतच पक्षाला मोठा राजकीय फायदा झाल्याचे दिसत आहे. कठोर प्रतिमा, सामाजिक काम आणि प्रशासकीय अनुभवामुळे भाजपला स्थानिक पातळीवर विश्वासार्हता मिळाल्याचे मानले जात आहे. केरळच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडवत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर तब्बल 45 वर्षांनी कब्जा केला आहे.











