Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : मुंबई पागडीमुक्त करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, १९ हजारांहून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाला गती

मुंबईतील जुन्या पागडी प्रणालीचा गुंता अखेर सुटणार आहे. शहर पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक नियमावली तयार केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. या नव्या नियमावलीमुळे भाडेकरू तसेच घरमालक या दोघांचेही हक्क सुरक्षित ठेवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nilesh Ghaywal,
पुणे

Nilesh Ghaywal, : लंडनला पलायन केलेला गुंड नीलेश घायवळ फरार घोषित

कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पलायन केलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांना हा निकाल दिला.

Gadchiroli
महाराष्ट्र

Gadchiroli : गडचिराेलीत अकरा जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात पाेलीसांना माेठे यश मिळाले आहे. ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पाेलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमाेर या अकरा नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली टाकली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

Anna Hazare
महाराष्ट्र

Anna Hazare : सशक्त लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून उपाेषण

राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. ३० जानेवारी २०२६ पासून समाजसेवक अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावातील यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.

Nana Patole
महाराष्ट्र

Nana Patole : दररोज आठ शेतकरी आत्महत्या ही बाब लाजीरवाणी, नाना पटाेले यांचा हल्लाबाेल

दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही बाब केवळ लाजीरवाणी नव्हे, तर राज्याच्या कृषी धोरणातील गंभीर अपयशाचे द्योतक असल्याचा हल्लाबाेल काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटाेले यांनी विधानसभेत केला.
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे सरकारकडून पालन न होताच, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीच्या पिकाचा योग्य मोबदला मिळत नसून शेतकरी पुन्हा संकटात ढकलले जात असल्याचा आराेप पटाेले यांनी केला. अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमधील मोठ्या प्रमाणातील कपाशीचे नुकसान झाले असून, या जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रे देखील सुरू झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

Ambadas Danve
महाराष्ट्र

Ambadas Danve : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेतकऱ्यांना मदतीबाबत चुकीची माहिती, अंबादास दानवे यांच्यावर कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत चुकीची माहिती पसरविल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाने दिला आहे.

Murli Dhar Mohol
महाराष्ट्र

Murli Dhar Mohol : देशात दोन लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्था, मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती

देशातील सहकाराचे जाळे अधिक मजबूत व्हावे, सहकार क्षेत्राचा समप्रमाणात विकास व्हावा, यासाठी सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२९ पर्यंत देशात नव्या दोन लाख बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी संस्थांची (एम पॅक्स) स्थापना करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ३२ हजार एम-पॅक्सची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर देशातील प्रत्येक पंचायतीत किमान एक सहकारी सेवा संस्था असेल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केले. ६० वर्षांहून अधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने सहकारावर फक्त राजकारण केले. मोदी सरकारने सहकाराला खऱ्या अर्थाने गती आणि बळकटी दिली, असेही मोहोळ म्हणाले.

Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : विदर्भावरील अन्यायाच्या मुद्यावर सुधीर मुनगंटीवार आक्रमक, वैधानिक विकास मंडळाचे कवच देण्याची मागणी

उद्याेगांपासून पायाभूत सुविधा सगळेच पुणे, मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचे काय असा सवाल करत माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार विदर्भावरील अन्यायाच्या मुद्यावर विधानसभेत आक्रमक झाले. विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी सरकारवरच अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वाहतूक पाेलीसांना मिळणार बाॅडी कॅमेरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वाहतूक नियमभंगाची कारवाई करताना वाहनचालकांसाेबत हाेणारे वाद टाळण्यासाठी राज्यातील वाहतूक पाेलीसांना बाॅडी कॅमेरे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रमुख शहरांत टप्याटप्याने कॅमेरे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chief Minister'
मुंबई

Chief Minister’ : उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का? हायकोर्टाचा थेट सवाल

पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही. हा सरकारी जमीन हडप करण्याचा गंभीर प्रकार आहे. अनेक आरोपींवर गुन्हे दाखल असताना, फक्त पार्थ पवार यांचे नाव नसण्यामागे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का. असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : हिंदूच्या विरोधात मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करत आहे. हिंदू समाजाविरोधात मस्ती करणारे दोन पायांवर आपल्या घरी जाणार नाही हे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

Amit Shah
देश-विदेश

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले नसते तर देशाचे विभाजन झाले नसते, अमित शहा यांचे विधान राज्यसभेत

वंदे मातरम् चे विभाजन केवळ एका गाण्याचे विभाजन नव्हते, तर देशाच्या वैचारिक एकात्मतेला कमकुवत करणारी घटना होती. वंदे मातरम् विभाजित करण्याच्या निर्णयामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली. देश विभाजित झाला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीकेला.