विशेष प्रतिनिधी
नागपूर: Eknath Shinde मुंबईतील जुन्या पागडी प्रणालीचा गुंता अखेर सुटणार आहे. शहर पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक नियमावली तयार केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. या नव्या नियमावलीमुळे भाडेकरू तसेच घरमालक या दोघांचेही हक्क सुरक्षित ठेवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. Eknath Shinde
राज्यात सुमारे १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. या इमारती १९६० पूर्वीच्या असल्याने त्यापैकी अनेकांचे पुनर्विकासाचे प्रयत्न अडकले आहेत. काही इमारती धोकादायक स्थितीत असून, सुमारे १३ हजारांहून अधिक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल कायद्यानुसार संरक्षण आहे आणि त्यांच्या करारांना वैधता आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. Eknath Shinde
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या नियमावलीबाबत महत्वाच्या तरतुदी जाहीर केल्या. त्यानुसार भाडेकरूंच्या ताब्यातील घराचे जितके क्षेत्र, तितका FSI देय असेल. मालकांना मालकीच्या भूखंडापोटी मूळ FSI देणे बंधनकारक आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि अत्यल्प उत्पन्न गटातील पागडीधारकांना नि:शुल्क पुनर्बांधणीसाठी ‘इन्सेंटिव FSI’ देण्यात येणार आहे. उंची मर्यादा किंवा अन्य अडचणींमुळे संपूर्ण FSI वापरता न आल्यास उर्वरित FSI हा TDR स्वरूपात देण्यात येणार
पागडी तत्त्वावरील इमारतींमध्ये २८ हजारांहून अधिक वाद प्रलंबित आहेत. अनेक कुटुंबे दशकानुदशके या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेली आहेत. पुनर्विकासाला गती देण्यासाठी या वादांचे जलद निराकरण आवश्यक असल्याने, उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर अतिरिक्त जलदगती न्यायालये स्थापन केली जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व खटले निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या निर्णयामुळे पागडी तत्त्वावर राहणाऱ्या लाखो नागरिकांना मालकी हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भाडेकरू आणि मालक या दोघांवरही अन्याय होणार नाही, याची हमी सरकारने दिली आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde announces to make Mumbai turban-free, accelerates redevelopment of more than 19,000 buildings
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध