Nana Patole : दररोज आठ शेतकरी आत्महत्या ही बाब लाजीरवाणी, नाना पटाेले यांचा हल्लाबाेल

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Nana Patole दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही बाब केवळ लाजीरवाणी नव्हे, तर राज्याच्या कृषी धोरणातील गंभीर अपयशाचे द्योतक असल्याचा हल्लाबाेल काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटाेले यांनी विधानसभेत केला.Nana Patole

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे सरकारकडून पालन न होताच, उत्पादकांना त्यांच्या मेहनतीच्या पिकाचा योग्य मोबदला मिळत नसून शेतकरी पुन्हा संकटात ढकलले जात असल्याचा आराेप पटाेले यांनी केला. अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमधील मोठ्या प्रमाणातील कपाशीचे नुकसान झाले असून, या जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रे देखील सुरू झाले नाही, असे त्यांनी सांगितले.Nana Patole



शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यात वाढत्या आर्थिक ताणामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली असून, पटोले यांनी आत्महत्येच्या प्रश्नालाही अधिवेशनात अधोरेखित केले त्यांनी सरकारवर संवेदनाशून्य आणि बोथट, असल्याचा आरोप करत सांगितले की, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी सरकारकडून तत्परता नसल्याने त्यांच्या वेदना अधिकच वाढत आहेत. त्यांना हमीभाव, विमा, नुकसान भरपाई, तांत्रिक मदत-कसलीही मदत वेळेवर मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, असे पटोले यांनी सभागृहात सांगितले.

पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे विशेष हस्तक्षेपाची विनंती केली. सरकारने दिलेल्या उत्तरात आणि प्रत्यक्ष पातळीवरील तुटवड्यात मोठे अंतर असल्याने, विषय अत्यंत संवेदनशील आणि तातडीचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपण या असंवेदनहीन सरकारला कडक सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या समस्या न सुटता वाढतच जातील. त्यांच्या उत्पादनाची खरेदीच सुरू नसल्याने आणि बाजारात भाव घसरल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकतील, असे पटोले म्हणाले. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत अध्यक्ष नार्वेकर यांनी या प्रकरणावर आपल्या दालनात बैठक घेण्याचे जाहीर करत पुढील कार्यवाहीचे संकेत दिले.

Eight Farmer Suicides Every Day is Shameful, Nana Patole Hits Out

महत्वाच्या बातम्या