विशेष प्रतिनिधी
गडचिरोली :Gadchiroli नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात पाेलीसांना माेठे यश मिळाले आहे. ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पाेलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमाेर या अकरा नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली टाकली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.Gadchiroli
आत्मसमर्पण करणाऱ्यांवर राज्य शासनाने एकूण ८२ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या ११ माओवाद्यांत चार महिला असून, तीन दाम्पत्याचा समावेश आहे.या माओवादींत २ डिव्हिजनल कमिटी सदस्य, ३ प्लाटून कमिटी सदस्य, २ एरिया कमिटी सदस्य आणि ४ सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. चार माओवादी आत्मसमर्पणाच्या वेळी माओवादी गणवेशात होते. अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश व कार्तिक मधिरा, उपअधीक्षक विशाल नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते.Gadchiroli
शुक्ला म्हणाल्या, दंडकारण्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरित माओवाद्यांनीही मुख्य प्रवाहात सामील व्हावे. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले, तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले.आत्मसमर्पण करणाऱ्यांत यांचा आहे समावेशआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भामरागड, बस्तर व एओबी क्षेत्रात काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे.त्यात डीव्हीसीएम रमेश ऊर्फ भीमा लेकामी, किरण हिडमा, पीपीसीएम लक्की अडमा, रतन ओयाम, कमला वेलादी, एसीएम कुमारी वेलादी, रामजी पुंगाटी, सोनू पोडीयाम, प्रकाश पुंगाटी, सीता पल्लो, साईनाथ मडे या माओवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर या सर्वांना शासनाकडून पुनर्वसनासाठी ६७ लाख रुपये मिळणार आहेत.
Eleven Naxalites surrender in Gadchiroli
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध