विशेष प्रतिनिधी
पुणे : Nilesh Ghaywal, कोथरूड गोळीबार प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून लंडनला पलायन केलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश के. पी. जैन-देसर्डा यांना हा निकाल दिला.Nilesh Ghaywal,
किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला होता. त्याने ९० दिवसांचा व्हिस्सा मिळवला आहे. याबाबत ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले असून घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी घायवळ याला फरार घोषित करण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्याने आता त्याच्या प्रत्यर्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल. कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात घायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोको) कारवाई करण्यात आली आहे. घायवळचा व्हिसा फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे.Nilesh Ghaywal,
घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीला ‘लूक आउट नोटीस बजाविली होती. त्यानंतर ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविण्यात आली होती. तर नुकतीच पुणे पोलिसांनी ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस देखील बजावली आहे. घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील जामखेडचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नीलेश घायवळने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डचा वापर केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र काढून प्रशासनाची फसवणूक करण्यासह इतर गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने घायवळला फरारी घोषित केले आहे. या निर्णयामुळे त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे, असे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
Gangster Nilesh Ghaywal, who fled to London, declared absconding
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध