Nitesh Rane : हिंदूच्या विरोधात मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी 

परभणी : Nitesh Rane  सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करत आहे. हिंदू समाजाविरोधात मस्ती करणारे दोन पायांवर आपल्या घरी जाणार नाही हे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. Nitesh Rane

परभणी जिल्ह्यातील रोहिला पिंपरी गावात २१ ऑक्टोबरला दोन गटांत फटाके फोडण्यावरून हाणामारी झाली होती. या घटनेतील जखमी मारोती डुकरे यांचा ६ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नितेश राणे यांनी सांत्वन केले.Nitesh Rane



राणे परभणी शहरातून परत जात असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रायगड कॉर्नर परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.

यावेळी राणे म्हणाले, हे महायुतीचे सरकार हिंदू धर्मीयांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, याची काळजी घेणारे हे सरकार आहे.

Those who make fun of Hindus will not go home on two legs, warns Nitesh Rane

महत्वाच्या बातम्या