विशेष प्रतिनिधी
नागपूर : Ambadas Danve मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत चुकीची माहिती पसरविल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाने दिला आहे. Ambadas Danve
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत म्हटले की, अंबादास दानवे जी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दानवे यांना देण्यात आला आहे. यावर अंबादास दानवे यांनी रिट्विट करत चौकशी अंती कारवाईची वाट पाहतो, असे प्रत्युत्तर दिले आहे. Ambadas Danve
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडे न गेल्याचा आराेप दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75 हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?
https://twitter.com/iambadasdanve/status/1999027357005607394
मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1998937174948065640
ऑक्टोबर 2025 या अवघ्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती ‘आयटीआय’मधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी संदर्भात आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती. यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी, उद्योगांनी आणि विविध संस्थांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीत उदंड योगदान दिले. ऑक्टोबर 2025 या एका महिन्यातच या निधीत एक अब्ज रुपयांहून अधिक देणगी जमा झाली, मात्र, त्याच कालावधीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेली मदत केवळ 75 हजार रुपये असल्याचे आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांच्या मागणीतून उघड झाले आहे.
Wrong information regarding help to farmers from Chief Minister’s Relief Fund, warning of action against Ambadas Danve
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध