विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis वाहतूक नियमभंगाची कारवाई करताना वाहनचालकांसाेबत हाेणारे वाद टाळण्यासाठी राज्यातील वाहतूक पाेलीसांना बाॅडी कॅमेरे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील प्रमुख शहरांत टप्याटप्याने कॅमेरे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
चलानच्या मुद्द्यावरून अनेकदा वाहतूक पोलिस व नागरिकांमधील वाद टोकाला जातात. गोव्यामध्ये वाहतूक पोलिसाकडे बॉडी कॅमेरा नसेल तर चलानची कारवाईच करता येत नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांनादेखील बॉडी कॅमेरे देण्यात येण्याबाबत विचार सुरू आहे.अगोदर राज्यातील प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने याला लागू करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.Devendra Fadnavis
विधानपरिषदेत आमदार सुनील शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडून ई-चालानसाठी खासगी मोबाइल फोनचा वापर करण्यात येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जर कुणी वाहतूक कर्मचारी असा प्रकार करत असेल तर तो चुकीचा आहे, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
या मुद्यावर बाेलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकदा वाहनचालकांना चालानचे एसएमएस उशिरा जातात. हीच बाब लक्षात घेऊन प्रणाली अपग्रेड करण्यात येत आहे. राज्यात जुन्या चालानची मोठ्या प्रमाणावर वसुली बाकी आहे. काही लोक वारंवार कारवाई होऊनदेखील चालान भरत नाहीत.अगदी परवानादेखील निलंबित झाला तरी लोकांना त्याचे फारसे काही वाटत नाही. चालानची थकबाकी लक्षात घेता तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅकिंग करण्यासंदर्भात एकसदस्यीय अभ्यास समिती गठीत करण्यात येईल. ती समिती तीन महिन्यांत अहवाल देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.