Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

महाराष्ट्र

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष, रवींद्र चव्हाण यांनी फोडले शिंदेंचे तीन मोहरे

शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेकडून भाजप आणि रविंद्र चव्हाणांचा निषेध करून टीका केल्यानंतर भाजपचे पदाधिकारीही आक्रमक झाले.

पुणे

प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा महापूर; महापालिकेकडे तब्बल २२ हजारांवर तक्रारी

पुणे महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

महाराष्ट्र

वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत मतदान कक्षात पूजा; भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा

नगरपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला मतदान केंद्रात जाऊन मतदान कक्षात पूजा केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.

Voter Registration
पुणे

Voter Registration : पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट

पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदार नोंदणीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे प्राथमिक मतदारयादीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ लाख ७२ हजार ६१ पदवीधर आणि ४४ हजार २३३ शिक्षक मतदारांनी नोंदणी केली आहे. मात्र ही संख्या २०२० मधील नोंदणीपेक्षा लक्षणीय कमी आहे.

Supriya Sule
महाराष्ट्र

Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनातील चर्चेदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत आणि निवडणुकीत झालेल्या अनुचित घटनांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Dr. Gauri Garje-Palve
महाराष्ट्र

Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप

भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे – पालवे यांची आत्महत्या नव्हे तर खून होता. त्यांना तीन जणांनी गळा दाबून ठार मारले, असा आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी केला.

मुंबई

Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप

Uddhav Thackeray : स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान आहे. . सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे, असा आराेप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुणे

Supriya Sule : केंद्र सरकारकडे पाठवला नाही कर्जमाफीसाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव, सुप्रिया सुळे यांचा आरोप

Supriya Sule : अतिवृष्टी होऊन आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन काही महिने उलटले असतानाही, राज्य शासनाने कर्जमाफीसाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना, कर्जमाफीच्या मागणीवर महाराष्ट्र सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध

नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वृक्षतोडीला विरोध केला आहे.

Municipalities
महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणुकीआधी महापालिकांचा धुरळा, गुरुवारी सर्व 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक

राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका झाल्यावर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महापालिका निवडणूक घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करत आहे. गुरुवारी सर्व 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक निवडणूक आयोगाने बोलवली आहे.

महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजवा, कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची मागणी

कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्यासाठी आदेश द्यावा असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक- अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे केला आहे.

Prithviraj Chavan
महाराष्ट्र

मतपेट्या गाेडाऊनमध्ये, सरकारला फेरफार करण्यासाठी पुरेसा वेळ, पृथ्वीराज चव्हाण यांची भीती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत.