वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत मतदान कक्षात पूजा; भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा

विशेष प्रतिनिधी

वडगाव मावळ : नगरपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीला मतदान केंद्रात जाऊन मतदान कक्षात पूजा केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. Vadgaon Maval

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजप उमेदवार अॅड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचा समावेश आहे. मतदान केंद्राध्यक्ष नवनाथ दळवी आणि भागवत झांबरे यांनी संयुक्तपणे फिर्याद दिली. Vadgaon Maval


पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट


२ डिसेंबर रोजी वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशकुमार साहनी इंग्लिश स्कूलमधील प्रभाग क्रमांक ६ आणि प्रभाग क्रमांक ८ च्या बूथमध्ये मतदान सुरू असताना हे तिन्ही उमेदवार प्रत्यक्ष मतदान कक्षात गेले आणि पूजा करण्यास सुरुवात केली. बूथ अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी कक्ष सोडला नाही, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेवर धार्मिक प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गंभीर नोंद घेतली. या तिन्ही जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१, २२३ आणि १७१ (ब) तसेच लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३०, १३१ आणि १३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम आणि उमेश जाधवराव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांकडून मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज, बूथ अधिकाऱ्यांचे जबाब आणि त्या दिवशीच्या सुरक्षा नोंदी तपासल्या जात आहेत.

Case Filed Against BJP, NCP Candidates for Performing Ritual Inside Polling Booth in Vadgaon Maval

महत्वाच्या बातम्या