राजभवन झाले ‘महाराष्ट्र लोकभवन’, संवाद व सहभाग यांचे केंद्र होण्याची राज्यपालांची अपेक्षा
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले होते.
नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत अनपेक्षितरित्या भाषिक वाद उभा राहिला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण ‘हेल्थ सिक्युरिटी ते नॅशनल सिक्युरिटी सेस बिल’वर भाषण करत असताना त्यांनी बिलाचे मुद्दे हिंदीत मांडले, ज्यावर टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी आक्षेप घेतला.
बिहारच्या मोतिहारी येथील भाजप आमदार प्रमोद कुमार यांनी महिलांबद्दल केलेले धक्कादायक आणि अश्लील वक्तव्य समोर आल्यानंतर प्रचंड संताप उसळला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन्हा मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पुढील एका वर्षात महामार्गावरील सध्याची टोल वसुली प्रणाली बंद होईल. त्याऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक, बॅरियर-लेस टोल प्रणाली लागू केली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. त्यामुळे टोलनाके इतिहासजमा होणार आहेत.
एका खासगी कंपनीकडे काम करीत असलेल्या एका अभियंत्याने अचानक नोकरी सोडून कंपनीचा डाटा, भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना व भारतीय नौसेना यांची महत्वपूर्ण माहिती चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Vijay Vadettiwar : सत्ताधारी महायुतीने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम घोटाळा करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी लांबवली आहे. भाजप आपल्या 175 जागा येणार असल्याची गोष्ट आतापासूनच लोकांच्या मनावर बिंबवत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदान आणि मतमोजणी स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषदेत केला.
भीमा कोरेगाव–एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हनी बाबू यांना बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ५ वर्षे ७ महिने तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. Bhima Koregaon Case
जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?