पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार? अंबादास दानवे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर: जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. Ambadas Danve

मुंढवा येथील जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘अमेडिया’ कंपनीचे नाव चर्चेत आले. या कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. दिग्विजय पाटील हे केवळ 1 टक्का भागीदार आहेत. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात अमेडिया कंपनीला जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानी यांना बुधवारी अटकही झाली आहे. मात्र, 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवार यांच्याबाबत तपास यंत्रणांनी सोयीस्कर मौन पाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. Ambadas Danve

दानवे यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट लक्ष्य केले आहे. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.


पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट


जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात? अमेडिया कंपनीत केवळ 1 टक्का भागधारक दिग्विजय हा 99 टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?

मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा सवाल दानवे यांनी केला आहे.

How Long Will the Company Keep Seeking Extensions in the Parth Pawar Case, Asks Ambadas Danve