राजभवन झाले ‘महाराष्ट्र लोकभवन’, संवाद व सहभाग यांचे केंद्र होण्याची राज्यपालांची अपेक्षा

विशेष प्रतिनिधी

मुबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले होते. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे असे राज्यपालांनी सांगितले होते. Maharashtra Lok Bhavan

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले होते. राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय दिशादर्शक आहे असे राज्यपालांनी सांगितले होते.

लोकभवन’ म्हणून ओळखले जाणारे राजभवन आता केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘लोकभवन’ हे सरकार आणि राज्यातील जनतेमध्ये सेवा, सहकार्य व संवादाचा सेतू व्हावे, हीच या नामांतरामागची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. ‘लोकभवन’ केवळ संवैधानिक कर्तव्यांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या आशा, आकांक्षा आणि समस्यांप्रीति संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नाते जपणारे खऱ्या अर्थाने लोक भवन असेल असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहे. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. ‘लोकभवन’ हे केवळ राज्यपाल यांचे निवासस्थान व कार्यालय नसून राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटना यांच्यासह संवाद आणि सहभाग साधणारे एक केंद्र आहे.

Raj Bhavan Becomes ‘Maharashtra Lok Bhavan’, Governor Hopes for a Hub of Dialogue and Public Participation

महत्वाच्या बातम्या