विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत अनपेक्षितरित्या भाषिक वाद उभा राहिला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण ‘हेल्थ सिक्युरिटी ते नॅशनल सिक्युरिटी सेस बिल’वर भाषण करत असताना त्यांनी बिलाचे मुद्दे हिंदीत मांडले, ज्यावर टीएमसी खासदार सौगत रॉय यांनी आक्षेप घेतला. Nirmala Sitharaman
सीतारमण बोलत असताना सौगत रॉय अचानक उभे राहिले आणि अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडे बोट दाखवत म्हणाले, “निर्मलाजी हिंदीत बोलल्या. मला त्यांचे काही समजले नाही, कारण आम्ही बंगाली आहोत. आम्हाला हिंदी समजत नाही.” Nirmala Sitharaman
अध्यक्षांनी सौम्य पण ठाम शब्दांत रॉय यांना उत्तर दिले, “सभागृहाची कार्यवाही अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही पार्लमेंट ॲपवर भाषांतर पाहू शकता.” यावरही रॉय माघार न घेता म्हणाले, “आम्ही बंगाली आहोत, आणि आम्ही बंगालीच राहू.”
अध्यक्षांनी त्वरित आक्षेप घेत सांगितले, “तुम्ही बंगाली असलात तरी तुम्ही हिंदीबद्दल अशा पद्धतीने बोलू शकत नाही.” यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले, “मी हिंदीत बोलू शकते, तमिळमध्ये बोलू शकते, तेलुगूत बोलू शकते, इंग्रजीत बोलू शकते. माननीय सदस्यांना याचा काय अडथळा आहे? ते जे हवे त्या भाषेत भाषांतर करून घेऊ शकतात. हे केवळ विधेयकावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी विधेयक नीट वाचलेदेखील नाही.”
अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ X वर शेअर केला आहे.
सौगत रॉय: निर्मलाजीही हिंदीत बोलल्या. मला त्यांचे बोलणे समजले नाही कारण आम्ही बंगाली आहोत. आम्हाला हिंदी फारशी समजत नाही.
अध्यक्ष जगदंबिका पाल: सभागृहाची कार्यवाही अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे आधीपासूनच पार्लमेंट ॲपवर आहे. तुम्ही ते पाहू शकता.
सौगत रॉय: आम्ही बंगाली आहोत, आणि आम्ही बंगालीच राहू.
अध्यक्ष जगदंबिका पाल: तुम्ही बंगाली आहात, पण तुम्ही हिंदीबद्दल अशा प्रकारे बोलू शकत नाही.
निर्मला सीतारमण: मी हिंदीत बोलू शकते, मी तमिळमध्ये बोलू शकते, मी तेलुगूत बोलू शकते, मी इंग्रजीत बोलू शकते. माननीय सदस्यांना याचा काय फरक पडतो? ते त्यांच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत भाषांतर करून घेऊ शकतात. हे सर्व विधेयकावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी विधेयक नीट वाचले नाही, आणि कारण त्यांना विषयावरून लक्ष विचलित करायचे आहे, म्हणून ते हे सर्व मुद्दे मांडत आहेत. यावर माझा आक्षेप आहे, आणि हे रेकॉर्डवर असले पाहिजे.
Language Row Erupts in Lok Sabha as TMC MP Objects to Nirmala Sitharaman’s Hindi Speech
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध