Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी हनी बाबू यांना अखेर जामीन; ५ वर्षांहून अधिक तुरुंगवासानंतर हायकोर्टाचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bhima Koregaon Case भीमा कोरेगाव–एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हनी बाबू यांना बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ५ वर्षे ७ महिने तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. Bhima Koregaon Case


पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला कमी प्रतिसाद; २०२० च्या तुलनेत मोठी घट


राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) हा आदेश तात्काळ स्थगित ठेवावा जेणेकरून ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतील, अशी मागणी न्यायालयात केली. मात्र हायकोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की हनी बाबू इतका दीर्घ काळ तुरुंगात आहेत की अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी व्यक्तीदेखील शिक्षा झाल्यानंतर इतका काळ तुरुंगात राहत नाहीत. Bhima Koregaon Case

प्रकरणातील विलंब, पुराव्यांतील अस्पष्टता आणि सुनावणीतील धीम्या गतीकडे पाहता त्यांना आणखी डांबून ठेवण्याचे कारण वाजवी नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

१ लाख रुपयांचा जामीन बॉंड भरावा लागेल. स्थानिक जातमुचलका द्यावी लागेल. महाराष्ट्रातून परवानगीशिवाय बाहेर जाता येणार नाही.साक्षीदारांशी संपर्क साधता येणार नाहीया अटी पूर्ण होताच बाबू यांची सुटका होणार आहे.

हनी बाबू यांना जुलै २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर माओवादी विचारधारेशी संपर्क असल्याच्या आरोपांखाली UAPAच्या कडक कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आरोप मात्र त्यांनी नेहमीच नाकारले आहेत. मानवाधिकार गटांनी सातत्याने न्यायालयीन विलंब आणि कैद्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष यावर टीका केली आहे.

Bhima Koregaon Accused Hany Babu Granted Bail After More Than Five Years in Jail

महत्वाच्या बातम्या