Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

मंदिराचा पैसा देवतेचा, अडचणीत असलेल्या बँका वाचवण्यासाठी वापरता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सज्जड इशारा

मंदिरातील निधी हा देवतेचा असून तो केवळ देवस्थानाच्या हितासाठीच वापरला जावा, अडचणीत सापडलेल्या सहकारी बँकांना वाचवण्यासाठी हा पैसा वापरणे मान्य होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार दिला.

Mohit Sharma
देश-विदेश

धुरंधरचा नायक आणि प्रत्यक्षातील महानायक, हिझबुलमध्ये घुसखोरी करून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शूरवीर मेजर मोहित शर्मा

भारताच्या लष्कराचा एक पराक्रमी, अदम्य आणि गुप्त मोहिमांचे प्रतीक असलेले म्हणजे मेजर मोहित शर्मा. २१ मार्च २००९ रोजी कुपवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान त्यांनी प्राणांची आहुती दिली

Sitharaman
देश-विदेश

Sitharaman : सिगारेट-पान मसाल्यात अतिरिक्त कर, पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

सिगारेट-पान मसाला यांसारख्या उत्पादनांवर सरकार आता अतिरिक्त कर लावणार असून अतिरिक्त करातून मिळणाऱ्या पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर केला जाईल, अशी माहिती माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

Rajabhau Vaje'
देश-विदेश

Rajabhau Vaje’ : साधूग्रामसाठी पवित्र तपोवनाची निवड का ? खासदार राजाभाऊ वाजे यांचा संसदेत सवाल

नाशिकमध्ये साधूग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.

Murlidhar Mohol
देश-विदेश

Murlidhar Mohol : इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

: इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनल समस्यांमुळे कालपासून पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनीकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Parth Pawar
पुणे

Parth Pawar : उद्याेग विभागाच्या पत्राचा दाखला, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्टॅम्प ड्युटीचे पैसे देण्यास नकार

पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्टॅम्प ड्युटीचे पैसे देण्यास नकार दिला आहे. उद्योग विभागाने दिलेले इरादा पत्र पूर्णपणे वैध होते. त्याच आधारावर आम्हाला स्टॅम्प ड्युटीत सवलत मिळाली होती. त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्नच येत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

महाराष्ट्र

Vijay Vadettiwar : महायुती सरकारने कामाची श्वेतपत्रिका काढावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी

Vijay Vadettiwar : महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या सरकारने अधिवेशनात आपल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्र

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी, सर्वाेच्च न्यायालयाचेही शिक्कामाेर्तब

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या विरोधातली याचिकाही फेटाळून लावली.

महाराष्ट्र

महायुती सरकारचा विश्वविक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

एका महिन्यामध्ये 45 हजार 911 सौर पंप लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. देशामध्ये 9 लाख पंप लागले आहेत, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

BJP-Shinde faction
महाराष्ट्र

BJP-Shinde faction : भाजपा-शिंदे गटातील वादावर पडदा, आपापसातील नेते पक्षात घेऊ नये, असा निर्णय

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट (BJP-Shinde faction) आणि भाजपा यांच्यातील वाद वाढले हाेते. शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपात घेतले जात असल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत हाेता. मात्र, आपापसातील नेते पक्षात घेऊ नये असा निर्णय झाल्याचे स्वत: रवींद्र चव्हाण यांनीच सांगितल्याने वादावर पडदा पडला आहे.

महाराष्ट्र

शिक्षकांचा आज बंद, संपात सहभागी झालेल्यांवर कारवाईचा इशारा

राज्यभरातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी “शाळा बंद” आंदोलनाची हाक दिली आहे.

पुणे

मार्केट गुरू’ अवधूत साठे आणि ट्रेडिंग अकॅडमीवर सेबीची कारवाई, ६०१ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश

देशभरात ‘मार्केट गुरू’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीवर सेबीने गुरुवारी कारवाई करत सर्व भांडवली बाजार व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली.