विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी “शाळा बंद” आंदोलनाची हाक दिली आहे. शिक्षण संचालकांनी आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांना कारवाईचा इशारा दिला आहे. Teachers strike
नवीन संचमान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे, दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती, तसेच ऑनलाइन अशैक्षणिक कामांचे वाढते ओझे यामुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज राज्यव्यापी बंदी हाक दिली आहे.
कारण नवीन संचमान्यतेमुळे गेल्या काही काळापासून राज्यभरातील 20 हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. त्यातच 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांकडून निदर्शने केली जाणार आहेत.
शिक्षकांच्या संपामुळे आज राज्यातील सुमारे 25 हजार शाळा बंद राहतील. ही संख्या राज्यातील एकूण शाळांच्या अंदाजे 25 टक्के आहे. या निषेधाचा शाळांवर मोठा परिणाम होऊ शकतो. याचपार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी निषेधात सहभागी होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या पगारात कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
Teachers strike today, warning of action against those participating in the strike
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध