Sitharaman : सिगारेट-पान मसाल्यात अतिरिक्त कर, पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Sitharaman  सिगारेट-पान मसाला यांसारख्या उत्पादनांवर सरकार आता अतिरिक्त कर लावणार असून अतिरिक्त करातून मिळणाऱ्या पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर केला जाईल, अशी माहिती माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.Sitharaman

लोकसभेत शुक्रवारी आरोग्य सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झाले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पान मसाला यांसारख्या वस्तू महाग होतील. विधेयकावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कारगिल युद्ध तयारीच्या कमतरतेमुळे झाले. लष्कराच्या जनरल्सनी सांगितले होते की, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून बजेटच्या कमतरतेमुळे लष्कराकडे केवळ 70-80% अधिकृत शस्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे होती. भारतात ती परिस्थिती पुन्हा कधीही येऊ नये अशी आमची इच्छा आहे.Sitharaman



उपकर कोणत्याही आवश्यक वस्तूंवर नाही, तर आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या हानिकारक वस्तूंवर लावला जाईल. त्यांनी सांगितले की, विधेयकाचा उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, सामान्य नागरिकांवर कोणताही भार न टाकता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी निधी मिळावा, असे त्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या विधेयकातून मिळणारा महसूल विशिष्ट आरोग्य योजनांसाठी राज्यांसोबत वाटून घेतला जाईल. ते म्हणाले की, 40 टक्के जीएसटी व्यतिरिक्त पान मसाला युनिट्सवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर देखील लावला जाईल.

उपकर कोणत्याही आवश्यक वस्तूंवर नाही, तर आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या हानिकारक वस्तूंवर लावला जाईल. त्यांनी सांगितले की, विधेयकाचा उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, सामान्य नागरिकांवर कोणताही भार न टाकता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी निधी मिळावा.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, या विधेयकातून मिळणारा महसूल विशिष्ट आरोग्य योजनांसाठी राज्यांसोबत वाटून घेतला जाईल. ते म्हणाले की, 40 टक्के जीएसटी व्यतिरिक्त पान मसाला युनिट्सवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर देखील लावला जाईल.

Extra Tax on Cigarettes and Gutka to Fund National Security, Says FM Sitharaman

महत्वाच्या बातम्या