विशेष प्रतिनिधी
पुणे : Parth Pawar पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने स्टॅम्प ड्युटीचे पैसे देण्यास नकार दिला आहे. उद्योग विभागाने दिलेले इरादा पत्र पूर्णपणे वैध होते. त्याच आधारावर आम्हाला स्टॅम्प ड्युटीत सवलत मिळाली होती. त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्नच येत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.Parth Pawar
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी अमेडियाला कहाण्या रचणे बंद करून मुद्रांक शुल्क भरण्याचा सल्ला दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत अमेडिया कंपनी व तिच्या भागधारकांचे लाड बंद करून त्यांच्यावर थेट दिवाणी व फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी केली आहे.Parth Pawar
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर मुंढवा येथील महार वतनाची 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कंपनीने केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. उद्योग संचालनालयाने त्यांचे मुद्रांक शुल्क अवघ्या 48 तासांत माफ केले होते. त्यानंतर अवघ्या 27 दिवसांत हा व्यवहार पूर्ण झाला होता. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पुणे पोलिसांनी नुकतीच शीतल तेजवानीला अटक केली. तेजवानीवर ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला विक्री केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर अमेडिया कंपनीने प्रस्तुत व्यवहारातील मुद्रांक शुल्क भरण्यास नकार दिला आहे.
अमेडिया कंपनीने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले आहे की, मुंढवा येथील सरकारी जमिनीविषयी उद्योग विभागाने दिलेले इरादा पत्र पूर्णपणे वैध होते. त्याच आधारावर आम्हाला स्टॅम्प ड्युटीत सवलत मिळाली होती. त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्नच येत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
अमेडिया कंपनीच्या या भूमिकेवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अमेडिया कंपनीने कितीही कहाण्या बनवल्या तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. अशी कोणतीही सूट देण्यात येत नाही. मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र उद्योग विभागाने दिले नाही. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे शुल्क भरावे लागेल. कंपनी चुकीच्या पद्धतीने कहाण्या बनवत आहे. खारगे रिपोर्ट आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल.
तूर्त जमीन व्यवहार करणाऱ्यांना अटक झाली आहे. आता सत्य समोर येईल. जमीन परस्पर विकणे अशा काही गोष्टी आहेत. एक महिना मुदतवाढ दिली आहे. कारण, त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. पुढील आठवड्यात अधिवेशन आहे. डेव्हलपमेंट कमिशनने वेळ मागितली आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, दोनदा मुदतवाढ मागितल्यानंतर अमेडिया कंपनीने आता स्टॅम्प ड्युटीचे 21 लाख रुपये भरण्यास नकार दिला आहे. आता तर खरे त्यांच्यावर तत्काळ दिवाणी व फौजदारी खटले दाखल करण्याची गरज आहे. त्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे व गुन्हेगारी कट करणे अशी सगळी कलमे त्यांच्यावर लागली पाहिजे. त्यांनी जी स्टॅम्प ड्युटी भरण्यास नकार दिला, त्यासाठी अमेडिया कंपनी व तिच्या भागिदारांकडून तब्बल 10 पट दंडात्मक रक्कम वसूल करता येते. ही रक्कम त्यांनी दिली नाही, तर त्याची दंडात्मक वसुली करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांतून किंवा प्रायव्हेट मालमत्तेवर जिल्हाधिकारी जप्ती सुद्धा आणू शकतात. ही कारवाई तत्काळ केली गेली पाहिजे असे माझे म्हणणे आहे. या प्रकरणाला आता 1 महिना लोटला आहे. यापुढे कोणताही वेळ न काढता त्यावर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
मुंढवा भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत अमेडिया कंपनीत केवळ 1 टक्का भागिदारी असणाऱ्या दिग्विजय पाटील व शीतल तेजवानी यांच्यावर कारवाई झाली आहे. गुरुवारीच शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.
Industry Department letter, Parth Pawar’s Amedia company refuses to pay stamp duty
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध