महायुती सरकारचा विश्वविक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : एका महिन्यामध्ये 45 हजार 911 सौर पंप लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. देशामध्ये 9 लाख पंप लागले आहेत, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadnavis

वर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या. आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. महाराष्ट्राचं प्रशासन हे एका संस्थेसारखं निर्माण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही. लाडक्या बहिणींचा योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. सौरकृषी पंप जी शेतकरी आणि शेतीची जीवनरेषा आहे, असे फडणवीस म्हणाले.



एका महिन्यामध्ये 45 हजार 911 पंप लावून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये 9 लाख पंप लागले आहेत, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावले आहेत. आपण शेतकऱ्यांसोबतची आमची चर्चा बघितली असेल तर शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय समाधान आहे. त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची योजना आहे, ती पुढच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करू. असे केल्याने महाराष्ट्र पहिलं राज्य असेल, जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि तेही सौर वीज देतो. त्यामुळे मला असं वाटतं खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पायाभूत सुविधांची कामे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्याची पावती आम्हाला जनता देत आहे.

एका वर्षामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही तसं जर मला विचाराल, तर हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं असा विचार करून मला रात्री झोप लागत नाही. कारण अनेक गोष्टी करायच्या आहेत. एक वर्षाचा काळ हा मोठा होत नाही. त्यामुळे निश्चितच खंत नाही, पण मला एक उत्सुकता आहे किंवा भावना आहे की, अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या आम्ही करू.

विजय वडेट्टीवार यांनी एक वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढायला सांगितली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा चांगला दिवस आहे, त्यामुळे मी कोणावरही काही बोलणार नाही. पण मला माहित आहे की, नेहमीच त्या सर्वांच्या मनामध्ये खदखद असते की, हे लोक इतकं करू शकले, तर आम्ही का करू शकलो नाही. या लोकांनी इतक्या योजना आणल्या, इतकी विकासाची कामं केली, तर आम्हाला संधी मिळाली, तेव्हा आम्ही का काम करू शकलो नाही, अशी एक भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे ती भावना अनेक बाहेर पडते, पण मी त्यावर फार टीका करणार नाही.

World record of the Mahayuti government, statistics given by Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या