विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात ‘मार्केट गुरू’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अवधूत साठे आणि त्यांच्या ट्रेडिंग अकॅडमीवर सेबीने गुरुवारी कारवाई करत सर्व भांडवली बाजार व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली. साठे दाम्पत्याने नोंदणीविना थेट गुंतवणूक सल्ले दिल्याचा आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रत्यक्ष ट्रेडिंग कॉल देऊन तब्बल ६०१ कोटी रुपये उकळल्याचा निष्कर्ष सेबीने काढला आहे. Avdhoot Sathe
या आदेशामुळे मुंबई आणि पुण्यातील फिनफ्लुएन्सर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, हा देशातील सर्वांत मोठा वित्तीय शिक्षण घोटाळा मानला जात आहे. सेबीच्या तपासात, साठे यांनी लाइव्ह मार्केट डेटा दाखवत प्रत्यक्ष खरेदी विक्रीच्या सूचना दिल्या. स्वतःच्या पोझिशन्स आणि नफ्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित केले. “चार्ट स्टडी” या नावाखाली व्हॉट्सअँप ग्रुपवर प्रत्यक्ष ट्रेडिंग कॉल दिले. विद्यार्थ्यांना कोर्स फी भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्यास प्रवृत्त केले. नफा दाखवताना फक्त यशस्वी ट्रेड्स पोस्ट केले, तोट्यांची माहिती दडवलीसेबीच्या अभ्यासानुसार ९ पैकी १० किरकोळ ट्रेडर्स सतत तोट्यात असतात. साठे यांच्या प्रस्तुतीत मात्र ‘सततचा नफा’ दाखवून विद्यार्थ्यांना आर्थिक जोखमीकडे ढकलल्याचा आरोप सिद्ध झाला.
सेबीने आदेशात म्हटले आहे की: ६०१ कोटींची एकूण वसुली करावी. यापैकी ५४६ कोटी रुपये अनधिकृत नफा. साठे दाम्पत्य आणि अकॅडमीची सर्व बँक आणि डिमॅट खाती तात्काळ गोठवणे. कुठल्याही स्वरूपात गुंतवणूक सल्ला, प्रशिक्षण, शिफारसी देणे पूर्णपणे बंद. सिक्युरिटी मार्केटमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष प्रवेशावर बंदी
साठे यांच्या दाव्यांना भुलून अनेक जणांनी वैयक्तिक कर्ज, सोने गहाण ठेवून कोर्स घेतले. डिसेंबर २०२४ पासून सेबीकडे तक्रारी येत होत्या. साठे यांच्या कोर्सची फी २५ हजार ते ३ लाख होती. “तुम्ही महिन्याला ५ ते १० टक्के नफा कमवू शकता” असे आश्वासन देत होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कर्ज काढून फी भरलीअनेक विद्यार्थ्यांनी सेबीला दिलेल्या निवेदनात लिहिले की, “आम्हाला शिक्षण दिले नाही तरआम्हाला जुगाराच्या जाळ्यात अडकवले.
या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्यातील फिनफ्लुएन्सर क्षेत्रात अचानक खळबळ उडाली असून, अनेक अकॅडमींनी आपली वेबसाइट अपडेट केली आहे. लाईव्ह ट्रेडिंग सत्र बंद केले आहे.
SEBI takes action against market guru ‘Avdhoot Sathe’ and Trading Academy, orders recovery of Rs 601 crore
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील गोंधळ राज्यसभेत; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका
- Dr. Gauri Garje-Palve : डाॅ. गाैरी गर्जे- पालवे यांचा तिघांकडून गळा दाबून खून, वडीलांचा आरोप
- Uddhav Thackeray : पेगाससचेच नाव बदलून संचारसारथी, उध्दव ठाकरे यांचा माेदी सरकारवर हेरगिरीचा आरोप
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध