Rajabhau Vaje’ : साधूग्रामसाठी पवित्र तपोवनाची निवड का ? खासदार राजाभाऊ वाजे यांचा संसदेत सवाल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Rajabhau Vaje’ नाशिकमध्ये साधूग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.Rajabhau Vaje’

नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून त्यासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पासाठी 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक कलाकारांनी याला जोरदार विरोध केला आहे.
संसदेत बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, नाशिकच्या तपोवन परिसरात साधूग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे. हा परिसर शहरसाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर पक्षी आणि जैवविविधतेचे केंद्र आहे. नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि विविध संस्थांनी या झाडे तोड विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले असल्याची माहिती वाजे यांनी दिली.Rajabhau Vaje’



राजाभाऊ वाजे म्हणाले, नाशिकमध्ये साधूग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, तर भविष्यातील हवामान सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्ष तोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यांचा तोल राखणारा पर्याय निवडावा, अशी मागणी वाजे यांनी केली आहे.

Why was the holy austerity chosen for Sadhugram? MP Rajabhau Vaje’s question in Parliament

महत्वाच्या बातम्या